सावधान ‘NoMoPhobia’ वाढतोय! जाणून घ्‍या नवीन सर्वेक्षणातील माहिती | पुढारी

सावधान 'NoMoPhobia' वाढतोय! जाणून घ्‍या नवीन सर्वेक्षणातील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मोबाईल स्‍मार्टफोन हा आपल्‍या जगण्‍यातील अविभाज्‍य भाग झाला आहे. काहीचं संपूर्ण जगणंच
स्‍मार्ट फोनने व्‍यापले आहे. अशा लोकांना स्‍मार्टफोनशिवाय जगणं ही कल्‍पना मनात प्रचंड भीती निर्माण करते. त्‍यांना मोबाईल फोनचे लागले व्‍यसनाने भयावह रुप प्राप्‍त केले आहे. नुकतेच याविषयी Oppo आणि Counterpoint ने देशात केलेल्‍या सर्वेक्षणामध्‍ये नोमोफोबिया (NoMoPhobia ) बाबतची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. ओप्पो आणि काउंटरपॉईंटने स्मार्टफोनच्या व्यसनावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाला ‘नोमोफोबिया’ असे नाव देण्यात आले.जाणून घेवूया या सर्वेक्षणातील माहितीविषयी…

NoMoPhobia : फोनपासून दूर राहण्याची भीती…

सर्वेक्षणातील माहितीनुसार, ६५ टक्के वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनशी भावनिकरित्या जोडलेले असतात. इंटरनेटचा डाटा संपेल का, फोन हरवेल का, फोनची बॅटरी पूर्णपणे संपणार तर नाही, अशी भीती त्यांना नेहमी वाटत असते. नोमोफोबिया ‘नो मोबाईल’ ही एक प्रकारची भीती आहे. मोबाईल फोनपासून दूर जाण्‍याची लोकांना खूपच भीती वाटते.

६० टक्‍के वापरकर्ते फोनच्या खराब बॅटरीमुळे त्रस्त

Oppo आणि Counterpoint ने आपल्‍या सर्वेक्षणात १,५०० मोबाईल वापरकर्त्यांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के वापरकर्त्यांनी सांगितले की, खराब बॅटरीमुळे ते त्रस्त आहेत.

महिलांपेक्षा पुरुषांना मोबाईल फोनची जास्त काळजी

या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना मोबाईल फोनची जास्त काळजी वाटते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८२ टक्के पुरुषांनी मान्य केले की, त्यांना स्‍मार्टफोनपासून लांब राहण्‍याचे जास्त टेन्शन असते. ७४ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना फोनची बॅटरी आणि दिवसभरातील इंटरनेट पॅक संपण्‍याची काळजी वाटते. सर्वेक्षणात सहभागी ९२.५ टक्‍के लोकांनी सांगितले की, ते पॉवर सेव्हिंग मोड वापरतात. ८७ टक्‍के वापरकर्ते की, ते त्यांचा फोन पूर्णपणे चार्ज झाल्यावरच वापरतात, असेही या सर्वेक्षणात स्‍पष्‍ट झाले.

४२ टक्‍के वापरकर्ते मनोरंजनासाठी करतात स्‍मार्टफोनचा वापर

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के लोकांनी सांगितले की, ते मनोरंजनासाठी स्‍मार्टफोनचा वापर करतात. मनोरंजनासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. सुमारे ६५ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना बॅटरी वाचवण्यासाठी अनेक वेळा फोनचा वापर बंद करावा लागतो.

हेही वाचा : 

Back to top button