Air India : अग्गSSS बाई! एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशाला विंचू चावला अन्...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Air India : एअर इंडिया फ्लाइटमध्ये अलीकडे काही ना काही घटना घडत असतात ज्यामुळे एअर इंडियाच्या सेवेविषयी वारंवार प्रश्नचिन्ह उद्भवत आहेत. एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये आता एक दुर्मिळ घटना घडली आहे. एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशाला विंचू चावला आहे. या घटनेमुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. कारण आजपर्यंत कोणत्याही फ्लाइटमध्ये कधीही अशा प्रकारची घटना घडलेली नाही.
एअर इंडियाच्या Air India नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एका प्रवासी महिलेला विंचू चावला. 23 एप्रिलला ही घटना घडली. एअर इंडियाकडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे. तसेच प्रवाशावर योग्य ते उपचार करण्यात आले असून तो आता धोक्याबाहेर आहे, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.
Scorpion stings passenger on Air India flight
Read @ANI Story | https://t.co/bsw8enzXAi#AirIndia #scorpion pic.twitter.com/DwuIaeBv5R
— ANI Digital (@ani_digital) May 6, 2023
एअर इंडियाच्या Air India प्रवक्त्याने एएनआयला याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, 23 एप्रिल 2023 रोजी आमच्या फ्लाइट AI 630 मध्ये एका प्रवाशाला विंचवाने डंख मारल्याची अत्यंत दुर्मिळ आणि दुर्दैवी घटना घडली होती. विमानतळावर विमान उतरताच या महिला प्रवाशावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमानतळावर डॉक्टरांना कल्पना दिली होती. त्यानुसार ते विमानतळावर हजर होते. तसेच आमचे अधिकारी प्रवाशासोबत रुग्णालयात गेले त्यांनी डिस्चार्ज होईपर्यंत प्रवाशाला सर्व प्रकारची मदत दिली, अशी माहिती एआयच्या प्रवक्त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, घटनेची माहिती मिळताच, एअर इंडियाच्या अभियांत्रिकी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. “आमच्या टीमने प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमानाची संपूर्ण तपासणी केली आणि विंचू सापडला. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत,” असे ते म्हणाले.
Air India : विंचू चावणे ही दुर्मिळ घटना
विमानांमध्ये आतापर्यंत जीवंत पक्षी किंव उंदीर सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, एखाद्या प्रवाशाला अशा प्रकारे विंचूने दंश केल्याची ही दुर्मिळ घटना आहे.
हे ही वाचा :
रोजगाराच्या मोठ्या संधी! Air India मध्ये १ हजारहून अधिक जागांसाठी भरती, जाणून घ्या अधिक