देशाच्या विदेशी चलन साठ्यात 4.5 अब्ज डॉलर्सने वाढ | पुढारी

देशाच्या विदेशी चलन साठ्यात 4.5 अब्ज डॉलर्सने वाढ

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, (दि. 5) : गत 28 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 4.5 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. विदेशी चलन साठा आता 588.78 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

विदेशी चलन साठा ऑक्टोबर 2021 मध्ये सर्वकालीन उच्चांकी स्तरावर म्हणजे 645 अब्ज डॉलर्सवर गेला होता. त्यानंतर या साठ्यात सातत्याने घट झाली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरु असलेली घसरण थांबविण्यासाठी रिझर्व्ह बँकेला चलन बाजारात हस्तक्षेप करावा लागत होता आणि त्यामुळे विदेशी चलन साठा घटला होता. रूपयाची घसरण थांबल्याच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चलन साठा वाढला आहे.

हे ही वाचा :

Air India : अग्गSSS बाई! एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशाला विंचू चावला अन्…

Economics Info : जीपीएफ, पीपीएफ आणि ईपीएफमध्ये फरक काय?

Back to top button