Violence In Manipur : ‘माझे राज्य मणिपूर जळत आहे’: मेरी कोमने ट्विटरवरून पीएम मोदींना केले मदतीचे आवाहन

Violence In Manipur : ‘माझे राज्य मणिपूर जळत आहे’: मेरी कोमने ट्विटरवरून पीएम मोदींना केले मदतीचे आवाहन

पुढारी ऑनलाईन: मणिपूरमध्ये, मेईतेई/मीतेईचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ बुधवारी (दि.३) येथील ऑल ट्रायबल्स स्टुडंट्स युनियन (एटीएसयू) या विद्यार्थी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात अचानक सहभागी आंदोलकांमध्ये हिंसाचार उसळला. यानंतर आंदोलकांनी घरांची तोडफोड आणि जाळपोळ (Manipur Violence) केली. येथील परिस्थिती पाहता, भारताची बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोमने तिच्या ट्विटरवरून ट्विट करत मणिपूरात उसळलेल्या हिंसाचारासंबधी केंद्र सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.

मेरी कॉम यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "माझे राज्य मणिपूर जळत आहे, कृपया मदत करा"(Violence In Manipur). यासोबत तिने मणिपूरमधील काही हिंसाचाराचे फोटो देखील ट्विटरवरून शेअर केले आहेत. तिने हे ट्विट पंतप्रधान कार्यालय, पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग या केंद्रिय मंत्री तसेच काही माध्यमांना देखील त्यांनी हे ट्विट टॅग केले आहे.

माध्यमांशी बोलताना माजी राज्यसभा खासदार, बॉक्सर एमसी मेरी कोम यांनी सांगितले आहे की, मणिपूरमधील परिस्थितीबद्दल मला दु:ख वाटत आहे. काल रात्रीपासून येथील परिस्थिती बिघडली आहे. मी राज्य आणि केंद्र सरकारला परिस्थितीसाठी पावले उचलण्याचे आणि राज्यात शांतता आणि सुरक्षा राखण्याचे आवाहन करते. या हिंसाचारात काही लोकांनी आपले कुटुंबीय गमावले हे दुर्दैव आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होणे आवश्यक (Violence In Manipur) आहे, असे देखील तिने स्पष्ट केल्याच्या वृत्ताचा व्हिडिओ एएनआयने दिला आहे.

आंदोलनात अचानक उसळलेल्या हिंसाचारानंतर (Violence In Manipur) येथील परिस्थिती अटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. येथील परिस्थिती लष्कराचे जवान राज्यातील विविध भागात फ्लॅग मार्च काढत आहेत. मणिपूर नागरी प्रशासनाच्या आवाहनावरून लष्कराला विविध भागात तैनात करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव मणिपूरमधील ८ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून, संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आल्याचे येथील सरकारने सांगितल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news