Recession Forecast 2023: आर्थिक मंदीचा भारतावर होणार शून्‍य टक्‍के परिणाम, ‘या’ देशांना बसणार सर्वाधिक फटका

Recession Forecast 2023: आर्थिक मंदीचा भारतावर होणार शून्‍य टक्‍के परिणाम, ‘या’ देशांना बसणार सर्वाधिक फटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : २०२३ वर्ष हे जागतिक मंदीचे ( Recession Forecast 2023) असेल, असे भाकित अनेक अर्थविषयक विश्‍लेषण करणार्‍या संस्‍थांनी मागील वर्षीच व्‍यक्‍त केले होते. जगातील विविध देशांमध्‍ये मंदीचे परिणामही मागील काही महिन्‍यांपासून दिसू लागले आहेत. मंदीच्‍या शक्‍यतेने विदेशातील अनेक कंपन्‍या बंद पडल्‍या आहेत. तसेच 'आयटी' क्षेत्रातील अनेक कंपन्‍यांनी कर्मचारी कपातही सुरु केली आहे. तसेच बॅकिंग क्षेत्रावरही याचा नकारात्‍मक परिणाम दिसू लागला आहे. जगातील काही देशांमध्‍ये निराशाजनक आर्थिक वातावरण असताना या वर्षी भारतात आर्थिक मंदीची शक्‍यता नाही, असा अंदाज  World of Statistics ने व्‍यक्‍त केला आहे.

World of Statistics ने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार, यावर्षी भारतावर आर्थिक मंदीचा शून्‍य टक्‍के परिणाम होणार आहे. ( Recession Forecast 2023 ) भारतात मंदी येण्‍याची शक्‍यता शून्‍य टक्‍के आहे. मात्र काही देशांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यामध्‍ये अमेरिका, जर्मनी आणि इंग्‍लंड या देशांचा समावेश अआहे. या देशांमध्‍ये अनेक खासगी कंपन्‍यांना जागतिक मंदीची झळ बसली आहे. आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्‍यांनी कर्मचारी कपात केली आहे.

Recession Forecast 2023 : आर्थिक मंदीचा सर्वाधिक प्रभाव पडणारे टॉप ३ देश

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्‍या अंदाजानुसार, आर्थिक मंदीचा सर्वाधिक प्रभाव हा ब्रिटनवर पडणार आहे. आर्थिक मंदीची सर्वाधिक म्‍हणजे ७५ टक्‍के झळ ब्रिटनला बसणार आहे. दुसर्‍या क्रमांकावर न्‍यूझीलंड असून, या देशाला ७० टक्‍के मंदीचा फटका बसेल तर अमेरिकेला ६५ टक्‍के आर्थिक फटका बसेल. दक्षिण कोरिया, जपान आणि रशियाला अनुक्रमे ३०, ३५ आणि ३७.५ टक्‍के मंदीची झळ बसेल, असाही अंदाज World of Statistics मध्‍ये व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

'या' देशांनाही बसणार आर्थिक मंदीची झळ

कॅनडा, इटली आणि जर्मनी देशांना आर्थिक मंदीचा ६० टक्‍के फटका बसेल. तर युरोपमधील सर्वाधिक भक्‍कम अर्थव्‍यवस्‍था मानल्‍या जाणार्‍या फ्रान्‍सही जागतिक मंदीच्‍या कचाट्यात सापडेल. फ्रान्‍सला ५० टक्‍के तर दक्षिण आफ्रिका ४५ आणि ऑस्‍ट्रेलियाला ४० टक्‍के  झळ बसेल, असा अंदाज World of Statistics ने व्‍यक्‍ते केला आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्समधील अंदाज हे जगभरातील व्‍यवसाय आणि आर्थिक गुंतवणूकदारांना निर्णय घेण्‍यासाठी उपयुक्‍त ठरतात.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news