commercial LPG cylinder rate : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल; जाणून घ्या नवे दर | पुढारी

commercial LPG cylinder rate : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल; जाणून घ्या नवे दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. आजपासून १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १७१.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये २९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १८५६.५० रुपये असणार आहे.

1 मे २०२३ म्हणजेच कामगार दिनादिवशी सरकारने एलपीजी सिलेंडरचे दरात कपात केली आहे. या कपातीमुळे अनेक शहरांमधील गॅस सिलेंडरचे दर बदलणार आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर घटले आहेत. १४.२ किलोच्या घरगुती गॅसच्या दरात मात्र सध्या कोणतेही बदल झालेले नाहीत. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १८५६.५० रूपये झाली आहे. मुंबईमध्ये १८०८.५० रूपये आणि चेन्नईमध्ये २०२१.५० रूपये आहेत. नवीन दर तेल कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर अपडेट केले आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button