COVID19 Update: कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट; २४ तासांत ५ हजार ८७४ रूग्णांची नोंद | पुढारी

COVID19 Update: कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट; २४ तासांत ५ हजार ८७४ रूग्णांची नोंद

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत सातत्याने घट सुरू आहे. गेल्या २४ तासांत देखील कोरोना रूग्णसंख्येत घट झाली आहे. २४ तासांत देशभरात ५ हजार ८७४ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ हजार १४८ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत देशभरात ४९ हजार १५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कालच्या तुलनेत भारतामध्ये रविवारी (दि.३०) कोरोनाच्या रुग्णांमध्ये १८% घट नोंदवली गेली आहे. काल एका दिवसात देशभरात २५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आत्तापर्यंत एकूण मृतांची संख्या ५,३१,५३३ इतकी नोंद करण्यात आली आहे. काल (दि.२९) देशभरात ७ हजार १७१ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर देशभरात एकूण ४० जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली होती.

राज्यात गेल्या २४ तासात ४८९ नवीन रूग्णांची नोंद

गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ४८९ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार १२६ कोरोना रूग्ण गेल्या २४ तासात कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात ८०,१२,८७३ इतके रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ४०४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.

हेही वाचा:

Back to top button