कोंढवा : महापालिका प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास उडाला : प्रशांत जगताप

कोंढवा : महापालिका प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास उडाला : प्रशांत जगताप

Published on

कोंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : 'महापालिका प्रशासनाच्या हाती कारभार आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांचा चक्काचूर झाला आहे. यामुळे लोकांचा प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. या परिस्थितीत विविध कामांच्या माध्यमातून नंदा लोणकर नागरिकांना दिलास देत आहेत,'असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

कोंढवा खुर्द येथील शहीद अब्दुल हमीद उद्यानामध्ये आमदार चेतन तुपे-पाटील यांच्या निधीतून व माजी नगरसेविका नंदा नारायण लोणकर यांच्या प्रयत्नातून ओपन जिमचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी प्रशांत जगताप बोलत होते. माजी शिक्षण मंडळ सदस्य नारायण लोणकर, संजय लोणकर, युवराज लोणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नंदा लोणकर म्हणाल्या, की खुर्चीवर बसून मला लोकांना मार्गदर्शन करायचे नाही, तर लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करून मला परिसर सुजलाम सुफलाम करायचा आहे. बापूसाहेब मुलाणी, मोहम्मद्दीन खान, ओबेद शहा, झोयेब काझी, भरत टोणपे, प्रवीण तांबे, पामेला पृथ्वी, नईम शेख, देवदास लोणकर, दत्ता डुरे, विश्वनाथ लोणकर, आल्ताप शेख, जावेद काझी, फिरोज कापती आदी या वेळी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news