केजरीवालांनी मुख्यमंत्री निवासस्थान नुतनीकरणावर केले ४५ कोटी खर्च : भाजपचा दावा | पुढारी

केजरीवालांनी मुख्यमंत्री निवासस्थान नुतनीकरणावर केले ४५ कोटी खर्च : भाजपचा दावा

पुढारी ऑनलाईन: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारी निवासस्‍थानाचे नुतनीकरण केले असून, यासाठी ४५ कोटी रुपये खर्च केले आहेत. दिल्ली कोरोनाच्या साथीने त्रस्त असताना, नुतनीकरणासाठीची ही रक्कम मंजूर करण्यात आली, असा दावा भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला आहे.

याबाबत बोलताना संबित पात्रा म्हणाले, जेव्हा दिल्लीत कोरोनाची महामारी शिगेला पोहोचली होती. लोकांचा बळी जात होता, तेव्हा अरविंद केजरीवाल आपल्या निवासस्थानाच्या नूतनीकरणात व्यस्त होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाच्या दुरूस्ती आणि नुतनीकरणासाठी ४४ कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्याचा आरोप भाजपने ‘ऑपरेशन शीशमहल’ च्या माध्यमातून केला आहे.

एका पडद्याची किंमत ७.९४ लाख रुपये

केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी ४५ कोटी रुपये खर्च केल्यानंतर भाजपने त्यांना ‘महाराजा’ असे संबोधले आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानासाठी खरेदी केलेल्या आठ पडद्यांपैकी एका पडद्याची किंमत ७.९४ लाख रुपये आहे, तर सर्वात स्वस्त पडद्याची किंमत ३.५७ लाख रुपये असल्याचे त्‍यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानासाठी १.१५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे संगमरवर व्हिएतनाममधून आणण्यात आला होता, तर चार कोटी रुपये प्री-फॅब्रिकेटेड लाकडी भिंतींवर खर्च करण्यात आले होते, असा आरोप भाजपने केला आहे.

भाजपच्या ‘ऑपरेशन शीशमहल’ अंतर्गत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ४५ कोटी रूपये सरकारी निवासस्‍थान नुतनीकरणासाठी खर्च केल्‍याचा आरोप केला आहे. याच मुद्यावरून दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

हेही वाचा :

Back to top button