नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद भारताशिवाय जगात कुठेही सापडत नाही,अशा शब्दात उपराष्ट्रपती जनदीप धनखड यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 'लादलेली शांतता' या दाव्याचा आज (दि.२६) समाचार घेतला. 'मला वेदना होतात आणि कधी कधी आपल्या बुद्धीजीवी वर्गाला काय झाले आहे,अशी भावना निर्माण होते. लादलेल्या शांततेवर दीर्घ लेख लिहिले जातात.पंरतु, देशात शांतता कशी लादली जावू शकते? भारतासारखे अभिव्यक्ती स्वातंत्र जगातील इतर कुठल्याही देशात सापडणार नाही,अशी भावना उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
'मन की बात @ १०० कॉन्क्लेव्ह'च्या उद्घाटन सत्राला संबोधित करतांना धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमापासून राजकारणाला दूर ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.आशा गमावत चाललेल्या आणि जागतिक प्रतिमा तळाला गेलेल्या देशासाठी ते एक आशेचा किरण म्हणून समोर आले होते.काही लोक परदेशी दौऱ्यादरम्यान देशात वेगाने होत असलेल्या विकासाकडे दुर्लक्ष करतात. शहामृगासारख्या भूमिकेची त्यांनी निंदा केली.देशाच्या विकास यात्रेवर 'मन की बात' कार्यक्रमाचा मोठा प्रभाव आहे.हा कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील या कार्यक्रमाचे एक उदाहरण आहे,असे उपराष्ट्रपती म्हणाले.
हेही वाचा :