पुढारी ऑनलाइन डेस्क : Onam Sadya : केरळमधील एर्नाकुलम जिल्हा ग्राहक निवारण आयोगाने एका रेस्टॉरंटला चांगलाच दणका दिला आहे. ग्राहकाने प्रिपेड डिश बुक करूनही ठरलेल्या वेळी ती डिश न पोहोचवल्याबद्दल ४0 हजारांचा दंड ठोठावला आहे. एका महिलेने याविषयी तक्रार दिली होती. तक्रारदार महिलेने वेळेत डिश न मिळाल्याने आपल्याला प्रचंड मानहानीला सामोरे जावे लागल्याचा दावा रेस्टॉरंट विरुद्ध ठोकला होता. २८ ऑगस्ट २०२१ मध्ये ही घटना घडली. वाचा सविस्तर प्रकरण काय आहे.
ओणम हा सण केरळचा सर्वात मोठा पारंपारिक सण आहे. या उत्सवात तिरुवोनमच्या दिवशी 'ओणम सद्या' ही विशेष डिश केली जाते. सणानिमित्त आपल्या घरी एकमेकांना पाहुण्यांना आमंत्रित करत असतात. ओणम हा सण प्रत्येक मल्ल्याळी व्यक्तिसाठी खूप खास असतो. ओणमला दिवाळीप्रमाणेच महत्व आहे. त्याचप्रमाणे 'ओणम सद्या' खाणे आणि पाहुण्यांना खाऊ घालणे हा विशेष आनंददायी भाग आहे.
तिरुवोनमच्या दिवशी खास 'ओणम सद्या' डिशसाठी येथील मेझ रेस्टॉरंटने जाहिरात करून अनेक ग्राहकांकडून प्री पेड ऑर्डर बुकिंग घेतले होते. श्रीमती विंद्या व्ही सुथन या महिलेने जाहिरात पाहून ५ डिश पैसे भरून बुक केल्या होत्या. त्याची किंमत १२९५ रुपये इतकी होती. मेझ रेस्टॉरंट हे दर्जेदार खाद्यपदार्थ आणि तत्पर सेवा देणारे एक नामांकित बहु-पाककृती रेस्टॉरंट असल्याचे सांगितले जाते.
श्रीमती बिंद्या यांनी मेझ रेस्टॉरंटकडे तिरुवोनमसाठी 21 ऑगस्ट 2021 ला प्रिपेड डिश बुक करून दुसऱ्या दिवशी पाहुण्यांसाठी मेजवाणीचा बेत आखता. ठरल्या वेळेप्रमाणे पाहुणे घरी आले. बुक केलेली ऑर्डर दुपारी एक वाजता डिलिवर केली जावी असे सांगितले होते. मात्र, एक वाजेपर्यंत ही ऑर्डर विंद्या यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यांनी यासाठी रेस्टॉरंटला अनेकदा कॉल केले. मात्र, रेस्टॉरंटने त्यांचा फोन उचलला नाही तसेच त्यांना कोणताही रिप्लाय दिला नाही. अखेर या महिलेच्या घरी आलेले पाहुणे जेवण न करताच निघून गेले. सायंकाळी ६ वाजता रेस्टॉरंटने काहीतरी सबब सांगून डिश डिलिवर करता आले नाही, असे सांगितले. तसेच पैसेही परत केले नाहीत.
या एकूण घटनेमुळे महिलेला आपल्या पाहुण्यांसमोर लज्जित व्हावे लागले तसेच मेजवानीचा बेत मानहानीचा बेत बनला. या झालेल्या एकूण मनस्तापामुळे बिंद्या यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आणि रेस्टॉरंटविरुद्ध ५० हजारांचा दावा ठोकला. तक्रारदाराची बाजू वकील राजेश विजयद्रन आणि अशोक यांनी मांडली.
एर्नाकुलमच्या ग्राहक निवारम आयोगाने या तक्रारीबाबत मेझ रेस्टॉरंटला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, रेस्टॉरंटने त्याची आदेश डावलून न्यायालयात हजर राहिले नाही. या दाव्यावर न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल दिला आणि मेझ रेस्टॉरंटला ४५ हजारांची भरपाई देण्यासाठी सांगितले.
या प्रकरणाचा निकाल देताना ग्राहक निवारण आयोगाने म्हटले आहे, "प्रत्येक मल्याळीला तिरुवोना सद्याशी भावनिक जोड आहे. 'सद्या'साठी पाहुण्यांना आमंत्रित करणे आणि बराच वेळ वाट पाहणे आणि 'स्पेशल ओणम सद्या' ऑर्डर न मिळणे खूप निराशाजनक आहे. विरुद्ध पक्ष (मेझ रेस्टॉरंट) तक्रारकर्त्याला नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहे. साहजिकच, विरुद्ध पक्षाच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदाराला 7 गैरसोय, मानसिक त्रास, त्रास, आर्थिक नुकसान इत्यादींचा सामना करावा लागला होता…
तक्रारदाराच्या बाबतीत योग्यता शोधून न्यायालयाने रेस्टॉरंटला भरलेल्या रकमेचा परतावा म्हणून ₹१,२९५, सेवेतील कमतरता आणि मानसिक त्रासासाठी ₹४०,००० भरपाई आणि कार्यवाहीच्या खर्चासाठी ₹५,००० देण्याचे निर्देश देणारा एक तत्सम आदेश जारी केला.