Lady Don Shaista Parvin : अतिकची बायको ‘लेडी डॉन शाइस्ता’ 61 दिवसानंतरही फरार; गुड्डू मुस्लिमला होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक

Lady don shaista parvin
Lady don shaista parvin

पुढारी ऑनलाइन डेस्क : Lady Don Shaista Parvin : उमेश पाल हत्याकांडानंतर आरोपी अतिक अहमद, मुलगा असद अहमद, अतिकचा भाऊ अशरफ या तिघांचा खात्मा झाला आहे. या आरोपींपैकी मुलगा असदचा एनकाउंटर करण्यात आला. तर अतिक आणि भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. दरम्यान, उमेश पाल हत्याकाडांतील आरोपी अतिकची बायको लेडी डॉन शाइस्ता परवीन ही तब्बल 61 दिवसानंतरही अद्याप फरार आहे. तिच्यावर पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना गुंगारा देणारी आरोपी शाइस्ता आता उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्ससाठी सर्वात मोठे आव्हान बनली आहे.

लेडी डॉन शाइस्तासह Lady Don Shaista Parvin या हत्याकांडातील आणखी एक आरोपी गुड्डू मुस्लिम हा देखील फरार आहे. लेडी डॉन शाइस्ता ही गुड्डू मुस्लिमसहच लपली आहे, अशा बातम्या समोर येत आहे. उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गुड्डू मुस्लिम हा अतिक अहमदचा खास माणूस होता. तर शाइस्ता सध्या पश्चिम बंगालमध्ये पळाली आहे, अशा देखील बातम्या समोर येत आहे. तर शाइस्ता अद्याप प्रयागराजमध्येच लपून बसली आहे, असाही दावा आहे. पोलिस सध्या शाइस्ताला पकडण्यासाठी प्रत्येक दृष्टीकोनातून रणनिती आखत आहे.

Lady Don Shaista Parvin : शाइस्ताला पकडण्यासाठी एसटीएफची विशेष शोध मोहीम

61 दिवसांपासून फरार असलेल्या शाइस्ताला पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स (STF) ने विशेष शोध मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे शाइस्ता आपल्या मुलगा आणि पति दोघांच्याही अंतिमसंस्कारालाही आली नव्हती. असे मानले जात आहे की ती अतिकच्या नेटवर्कचा वापर करून पोलिसांपासून लपून राहत आहे. एसटीएफ तिचा उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यात शोध घेत आहे.

Lady Don Shaista Parvin : गुड्डू मुस्लिमला होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक

उमेश पाल हत्याकांडातील एक मुख्य आरोपी आणि अतिकचा खास हस्तक असलेला गुड्डू मुस्लिम हा देखील फरार आहे. अतिकचा मुलगा असदचा एनकाउंटर करण्यात आला. त्यावेळी गुड्डू फरार होण्यात यशस्वी झाला होता. गुड्डू मुस्लिमवर 5 लाख रुपयांचे बक्षीस आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार गुड्डू मुस्लिम हा पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद किंवा त्याच्या आसपासच्या जागेवर लपून बसला आहे. एजन्सीज गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम बंगालच्या अनेक जागांवर छापेमारी करत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार पोलिस गुड्डूच्या खूप जवळपास पोहोचली आहे आणि कोणत्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news