Mann Ki Baat : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला लोको पायलट 'सुरेखा यादव' यांचे पीएम मोदींकडून कौतुक | पुढारी

Mann Ki Baat : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला लोको पायलट 'सुरेखा यादव' यांचे पीएम मोदींकडून कौतुक

पुढारी ऑनलाईन: आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव हिने आणखी एक विक्रम केला आहे. सुरेखा यांनी सोलापूर ते सीएसएमटी दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस यशस्वीपणे चालवत, भारताची पहिली महिला लोको पायलट बनली. यासाठी पीएम मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. गेल्या काही दिवसातील सुरेखा यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे पीएम नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या कन्या सुरेखा यादव यांचे मन की बात मध्ये कौतुक केले आहे. मन की बातचा आज (दि.२६) ९९ वा भाग प्रसारित करण्यात आला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले.

मन की बात मध्ये महिला सक्षमीकरणविषयी बोलताना पीएम मोदी म्हणाले, सध्या भारताची नारी शक्ती आघाडीवर आहे. तसेच भारतीय लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या (The Elephant Whisperers )  लघूपटाने ऑस्‍कर पुरस्‍कारावर आपली मोहर उमटवली. या फिल्मने बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या महिला निर्माता गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोंजालविस यांचे देखील मन की बात दरम्यान पीएम मोदी यांनी कौतुक केले.

कोण आहेत साताऱ्याच्या सुरेखा पवार

महाराष्ट्रातील साताऱ्याच्या सुरेखा यादव या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. त्यांनी मागच्या आठवड्यात सोमवारी (दि. 13) सोलापूर ते सीएसएमटी दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस यशस्वीपणे चालवली. मेक इन इंडियाअंतर्गत तयार केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चालवून त्यांनी मध्य रेल्वेचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्रातील सातारा येथील सुरेखा यादव या 1988 मध्ये भारतातील पहिल्या महिला रेल्वेचालक बनल्या. त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button