Mann Ki Baat : PM मोदींकडून ‘मन की बात’मधून ‘अवयव दानाविषयी जनजागृती’, महिला सक्षमीकरण व अन्यही महत्वाचे मुद्दे… | पुढारी

Mann Ki Baat : PM मोदींकडून 'मन की बात'मधून 'अवयव दानाविषयी जनजागृती', महिला सक्षमीकरण व अन्यही महत्वाचे मुद्दे...

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात Mann Ki Baat कार्यक्रमातून ‘अवयव दानाचे’ महत्व अधोरेखित करत या क्षेत्रात होत असलेल्या जनजागृती विषयी समाधान व्यक्त केले. सरकारने अवयवदान विषयी केलेल्या नियमात बदल करून ते सुलभ केले आहे. याविषयी त्यांनी माहिती दिली आणि जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावे यासाठी देशवासियांनी आवाहन केले. याशिवाय महिला सक्षमीकरण ते शेतीपर्यंतच्या अनेक महत्त्‍वाच्‍या गोष्टींचा उल्लेख केला.

Mann Ki Baat : कार्यक्रमाचा आज 99 वा भाग

मन की बात या कार्यक्रमाचा आज 99 वा भाग प्रसारित झाला. या वेळी त्यांनी अवयव दान सारख्य क्षेत्रात निर्माण झालेल्या जागरुकतेचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले आधुनिक मेडिकल सायन्समध्ये अवयवदान ही जीवनदानासाठी एक मोठे माध्यम बनले आहे. जेव्हा एक व्यक्ती मृत्यूनंतर आपले शरीर दान करतात तेव्हा त्या 8 ते 9 लोकांना एक नवीन जीवन मिळण्याची संभावना तयार होते. 2013 मध्ये अवयव दान 5 हजार पेक्षा ही कमी केसेस होत्या. मात्र 2022 मध्ये ही संख्या वाढून 15 हजारपेक्षा जास्त झाली आहे. ही बाब संतोषजनक आहे. लोकांमध्ये अवयवदानाबात जनजागृती होत आहे.

यावेळी त्यांनी अवयव दान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांसोबत त्यांनी चर्चा करत त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. तसेच त्यांना या कार्याची प्रेरणा कशी मिळाली याविषयी पंतप्रधानांनी जाणून घेतले. तसेच त्यांच्या निर्णयाबाबत त्यांचे कौतुक केले.

Mann Ki Baat : वंदे भारतच्या ‘लोको पायलट सुरेखा यादव’ यांचा उल्लेख

पीएम मोदी म्हणाले की ही नवरात्रीची वेळ आहे, शक्तीची उपासना करण्याची वेळ आहे. यावेळी महिला सक्षमीकरणाबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, आज भारताची क्षमता एका नव्या दृष्टीकोनातून समोर येत आहे, त्यात आपल्या स्त्रीशक्तीचा खूप मोठा वाटा आहे. अलीकडे अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आली आहेत. आशियातील पहिली महिला लोको पायलट महाराष्ट्रातील साता-याची सुरेखा यादव यांना तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल. आणखी एक विक्रम नोंदवत सुरेखा वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोको पायलट बनली आहे.

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या डॉक्यमेंट्रीसाठी निर्मात्या गुणित मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोंजाल्विस यांनी ऑस्कर पुरस्कार मिळवून भारताचे नाव उंचावले आहे. तर भाभा ऑटोमिक रिसर्चच्या साइंटिस्ट ज्योतिर्मयी यांना केमेस्ट्री केमिकल इंजिनिअरमध्ये आययुपीएसीचा मोठा पुरस्कार जिंकला. 19 वर्षाखालील महिला क्रिकेट टीमने विश्वचषकावर आपले नाव कोरले. तर नागालँडमध्ये 75 वर्षात पहिल्यांदाच महिला खासदार निवडून आल्या आणि तिथे पहिल्यांदा एक महिला मंत्री देखील झाल्या. याशिवाय तुर्कीत ऑपरेशन दोस्तमध्ये सहभागी झालेल्या एनडीआरएफच्या महिला जवान, आदि महिलांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला.

Mann Ki Baat : स्वच्छ उर्जेबाबत भारताचे जगभरात कौतुक

स्वच्छ उर्जेच्या क्षेत्रात भारताचे जगभरात कौतुक केले जात आहे. सोलर उर्जेत भारत दिवसेंदिसव प्रगती करत आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सोलार उर्जेचा वापर करणा-या एका सोसायटीचा उल्लेख केला. याशिवाय दीव दमण येथील सोलार प्रोजेक्टविषयी माहिती दिली. पुणे आणि दीव या दोन्ही ठिकाणांच्या सोलार उर्जेच्या प्रोजेक्टमुळे खर्चात मोठी बचत झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे.

जम्मू काश्मीरच्या शेतकरी त्यांच्या शेतीत करत असलेल्या प्रयोगांबाबत आणि डल येथील कमल काकडीच्या पिकाला विदेशातून मिळत असलेल्या मागणीबाबत तसेच अन्य पिकांबाबत माहिती दिली.

हेही वाचा :

Back to top button