Amritpal Singh : अमृतपाल सिंगचे पाक कनेक्शन उघड; पंजाब सरकारसह ‘एनआयए’चा केंद्राला अहवाल | पुढारी

Amritpal Singh : अमृतपाल सिंगचे पाक कनेक्शन उघड; पंजाब सरकारसह ‘एनआयए’चा केंद्राला अहवाल

अमृतसर; वृत्तसंस्था : ‘वारिस पंजाब दे’ या फुटीरवादी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग फरार झाल्यानंतर एका परदेशी क्रमांकाचा वापर करत होता. व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगच्या माध्यमातून तो आपल्या सहकार्‍यांच्या संपर्कात होता. यास अमृतपालचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शनही उघडकीला आले आहे. (Amritpal Singh)

केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडे अमृतपालशी संबंधित अहवाल मागवला होता. पंजाब सरकारने तो तातडीने केंद्राकडे पाठविला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एनआयए) या प्रकरणातील तपासाचा प्राथमिक अहवाल केंद्राला सोपविला आहे. दोन्ही अहवालांतून अमृतपाल देशाच्या सार्वभौमत्वासाठी एक मोठा धोका बनलेला असल्याची धक्कादायक माहिती नमूद आहे. (Amritpal Singh)

अमृतपाल सिंगला परदेशातून होणारी फंडिंग तसेच त्याचे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेशी असलेले संबंध आदी बाबींचा उल्लेख एनआयएच्या अहवालातून आहे. (Amritpal Singh)

कारवाई काय? हेतू काय?

  • कारवाई : अमृतपाल सिंगप्रकरणाय आतापर्यंत 400 वर जणांना अटक करण्यात आली आहे.
  • हेतू : अमृतपालला पडद्यामागून मदत करणार्‍यांच्या कॉलरपर्यंत केंद्र सरकारला पोहोचायचे आहे.

सीमशिवाय फोनचा वापर!

  • फरार झाल्यानंतर अमृतपाल सिंग परदेशी क्रमांकावरून आपल्या सहकार्‍यांच्या संपर्कात होता.
  • अमृतपाल सिंगनी हरियाणातून डोंगल खरेदी केले. नंतर एक कॅनेडियन नंबर घेतला. त्यावरून तो केवळ व्हॉट्सअ‍ॅप वापरत होता.
  • कोणतेही सीम न वापरता कॅनेडियन नंबरचा कोड व्हॉट्सअ‍ॅपमध्ये तो वापरत होता.

अधिक वाचा :

Back to top button