माजी पंतप्रधान मनमोहन सिंग प्रकृती बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल - पुढारी

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग प्रकृती बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते डाॅ. नितीश नायक यांच्या देखरेखाली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आला, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता. आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती आहे.

२००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान पदावर राहिलेले मनमोहन सिंग यांना यावर्षी कोरोनाची लागण झाली होती. ते १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर २९ एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

Back to top button