पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील नागरिकांनी मला १९ वर्षांपूर्वी हे सरकारी घर दिले होते. मी सत्य बोलण्याची किंमत मोजत आहे. तसेच मी सत्य बोलण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. दिल्ली येथील आपलं सरकारी निवासस्थान सोडताना ते माध्यमाशी बोलत होते.
खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांना दिल्ली येथील त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्याचा आदेश देण्यात आला होता. राहुल गांधी यांनी२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर 12 तुघलक लेन येथील बंगला देण्यात आला होता. त्यांनी तो आज सोडला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "देशातील नागरिकांनी मला १९ वर्षे हे घर दिले. मला त्यांचे आभार मानायचे आहेत. सत्य बोलण्याची किंमत आहे. मी सत्य बोलण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे." असे म्हणत त्यांनी सरकारी निवासस्थान रिकामे केले.
मोदी आडनावावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल राहुल गांधींना सूरत न्यायालयाने दोषी ठरले. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काँग्रेसचे खासदार ते अपात्र ठरले. याबाबत निवडणूक आयोगासह संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. दरम्यान, सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींच्या मोदी आडनावाच्या टीकेवर दोषी ठरविण्यास स्थगिती देण्याच्या याचिकेवर आपला निर्णय राखून ठेवला आहे. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
हेही वाचा :