

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय विद्यापीठे आणि अन्य विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक विद्यापीठीय प्रवेश परीक्षा (CUET-PG ) ५ ते १२ जून या कालावधीत होणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने आज (दि. २०) केली.
सीयूईटी पीजी परीक्षेसाठी उमेदवार ५ मेपर्यंत अर्ज करु शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल होती. आता राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून परीक्षाची तारीख झाली आहे. ५ जून ते १२ जून या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाच्या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :