Ramesh Dhanuka : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी रमेश धनुका, सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलिजियमची शिफारस | पुढारी

Ramesh Dhanuka : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी रमेश धनुका, सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलिजियमची शिफारस

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : मुंबईसह पाच उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलिजियमने शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून रमेश धनुका यांची शिफारस करण्यात आली आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती कामकाज पाहत असलेल्या एस. व्ही. गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस करण्यात आली आहे.(Ramesh Dhanuka)

पाच अन्य उच्च न्यायालयांमध्ये केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयांचा समावेश आहे. यातील केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून एस. व्ही. भट्टी, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून ऑगस्टीन जाॅर्ज मसिह तर हिमाचलचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून एम. एस. रामचंद्र राव यांची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दिपांकर दित्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीपद रिकामे झाले होते. या पदाचा प्रभारी कार्यभार एस. व्ही. गंगापूरवाला यांच्याकडे देण्यात आला होता.

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस झालेले रमेश धनुका सध्या याच न्यायालयातच कार्यरत आहेत. न्यायमूर्ती म्हणून ते 23 जानेवारी 2012 रोजी रुजू झाले होते. वरिष्ठतेनुसार त्यांना या पदावर बढती मिळाली असली तरी धनुका यांना सव्वा महिन्याचाच कालावधी मिळणार आहे.

हेही वाचा 

Back to top button