पाकचे परराष्‍ट्रमंत्री गोव्यात येणार; SCO च्या बैठकीत होणार सहभागी

पाकचे परराष्‍ट्रमंत्री गोव्यात येणार; SCO च्या बैठकीत होणार सहभागी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे ४ आणि ५ मे दरम्यान गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज बलोच यांनी आज (दि. २०) ही घोषणा केली आहे. द्विपक्षीय संबंधांची स्थिती पाहता भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिलेले निमंत्रण महत्त्वाचे मानले जात आहे. हिना रब्बानी खार या जुलै २०११ मध्ये भारतात आलेल्या पाकिस्तानच्या शेवटच्या परराष्ट्र मंत्री होत्या.

भारतातील बैठकीमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सहभागाची घोषणा करताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "बैठकीतील सहभाग पाकिस्तानची एससीओ चार्टर व प्रक्रियांशी असलेली कटिबद्धता आणि पाकिस्तानने आपल्या परराष्ट्र धोरणाच्या प्राधान्यक्रमात या क्षेत्राला दिलेले महत्त्व दर्शवते." भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांमार्फत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एससीओ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी गोव्यात येण्यासाठी आमंत्रण पाठवले होते. भारत आणि पाकिस्तान एससीओचे सदस्य आहेत. एससीओमध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानसह आठ सदस्य देश आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news