नवी दिल्ली,पुढारी वृत्तसेवा: संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांना कोरोनाची बाधा झाली असून, सध्या ते घरातच विलगीकरणा असल्याची माहिती आज (दि.२०) सूत्रांनी दिली. हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेत ते भाग घेणार होते. तथापि कोरोना झाल्यामुळे त्यांचे पुढचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मंत्री राजनाथ सिंग यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे डाॅक्टरांनी सांगितले. राजनाथ सिंग यांनी बुधवारी आर्मी कमांडर्स परिषदेत सहभाग घेतला होता. आज ते हवाई दल कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. आर्मी कमांडर्स परिषदेस लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.
देशात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असून, मागील चोवीस तासांमध्ये १२ हजार ५९१ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. याच कालावधीत ४० लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ६५ हजारांवर गेली आहे.
हेही वाचा