सोने झळाळले @ 61,400 | पुढारी

सोने झळाळले @ 61,400

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम म्हणून सोन्याची झळाळी गेल्या आठ दिवसांत वाढली आहे. शनिवारी सोन्याच्या दराने मोठी उसळी मारली. कोल्हापूर बाजारात सोन्याचा भाव जीएसटीसह प्रतितोळा 61 हजार 400 रुपयांवर वधारला. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात प्रतितोळा जवळपास 2,000 रुपयांची वाढ झाली.

शुक्रवारी कोल्हापुरात जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 59,500 होता. त्यात जवळपास 2,000 रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी रात्रीनंतर सोन्याने 60 हजारांचा टप्पा ओलांडला. आज कोल्हापुरातील सोन्याचा भाव 61 हजार 400 रुपयांवर गेला. शनिवारी सराफ बाजार बंद असल्याने याचा परिणाम जाणवला नाही. मात्र, दरवाढ झाली तरी पाडव्याच्या मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात गर्दी राहील, अशी शक्यता आहे.

8 मार्च रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर मात्र सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. सोन्याचे दर जागतिक बाजारपेठेनुसार रोजच्या रोज बदलतात. आंतरराष्ट्रीय मोठ्या वित्तीय संस्था बुडाल्याने गुंतवणुकीचा ओघ सोन्याकडे वळला आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढले. सराफ बाजारातील जाणकारांच्या अंदाजानुसार ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असून, सोन्याचे दर 65 हजार पार होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या
Back to top button