राज्यात भाजपची ताकद कमी झाल्याचा अहवाल दिलेला नाही : विनोद तावडे

विनोद तावडे
विनोद तावडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे, ज्यात राज्यात भाजपची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. पण असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपची शक्ती शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे, असे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

येत्या वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 आमदार भाजपसोबत आले असले तरी उद्धव ठाकरे यांची सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र राहिल्यास भाजपला राज्यात लोकसभेत मोठा खड्डा पडू शकतो. भाजपला 12 ते 15 जागाच जिंकता येऊ शकतात असा एक सर्वे करण्यात आलेली चर्चा आहे. विनोद तावडे यांनीही यासंबंधी आपला अहवाल दिल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी खुलासा करत आपण राज्याबाबत असा कोणताही अहवाल दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजप अधिक मजबूतच झाली आहे, असा दावाही तावडे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news