Arvind Kejriwal : भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी | पुढारी

Arvind Kejriwal : भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे भ्रष्ट असल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून आज (दि.१७) करण्यात आली. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांची सीबीआयने तब्बल ९ तास मॅरेथॉन चौकशी केली होती.

केजरीवाल हे भ्रष्ट असून ते दिल्लीकरांची आणखी दिशाभूल करु शकत नाहीत, असे भाजप नेते दुष्यंतकुमार गौतम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केजरीवाल स्वतःला ईमानदार असल्याचे सांगतात, मात्र प्रत्यक्षात ते बेईमान आहेत. सत्येंद्र जैन व मनिष शिसोदिया हे प्रामाणिक असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता. तथापि हे नेते आता तुरुंगात आहेत, न्यायालयाकडून त्यांना जामीनही मिळू शकलेला नाही. केजरीवाल यांची विश्वसनीयता संपलेली आहे. दिल्लीतील असंख्य प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. यमुना नदीची स्वच्छता, महिलांची सुरक्षितता असो वा इतर विषय असो, केजरीवाल सरकार अपयशी ठरले आहे, असे गौतम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button