NetflixDown: नेटफ्लिक्सचा सर्व्हर डाऊन: वेबसाइट ओपन होत नसल्याने हजारो यूजर्स हैराण | पुढारी

NetflixDown: नेटफ्लिक्सचा सर्व्हर डाऊन: वेबसाइट ओपन होत नसल्याने हजारो यूजर्स हैराण

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (NetflixDown) डाऊन झाल्याने अमेरिकेतील हजारो यूजर्स हैराण झाले आहेत. नेटफ्लिक्स यूजर्संना मोबाइल अॅप तसेच साइटवर अडचणी येऊ लागल्या आहेत. ट्विटरवरही युजर्स तक्रारी करत आहेत. #NetflixDown ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला आहे. शेकडो यूजर्संना व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत आहेत. डाउन डिटेक्टरनेही नेटफ्लिक्स डाऊन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डिटेक्टरनुसार रविवारी रात्री उशिरा अमेरिकेमधील 11, हजारहून अधिक यूजर्संची Netflix सेवा सुमारे दोन तास बंद झाली होती. आउटेजमुळे लव्ह इज ब्लाइंड: द लाइव्ह रीयुनियन शोच्या प्रसारणास विलंब झाला. व्हेनेसा आणि निक लॅची होस्ट करणार असलेला हा शो लॉस एंजेलिसमधून प्रसारित केला जाणार होता. नेटफ्लिक्सचे सदस्य शो सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधी शोच्या वेटिंग रूममध्ये सामील होऊ शकतात. परंतु अनेक यूजर्संनी सुमारे 45 मिनिटांनंतरही प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार केली.

NetflixDown नेटफ्लिक्सने माफी मागितली

नेटफ्लिक्सने आज सकाळी 6:59 वाजता ट्विट करून युजर्सची माफी मागितली आहे. रविवारची दुपार चुकलेल्या प्रत्येकासाठी… लव्ह ब्लाइंड लाइव्ह रीयुनियन हे आमच्या नियोजित प्रमाणे घडले नाही. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. हा शो आत्ता पुन्हा चित्रित केला जाणार आहे. आम्ही तो शक्य तितक्या लवकर नेटफ्लिक्सवर ठेवू. धन्यवाद आणि क्षमस्व.

हेही वाचा 

Back to top button