Netflix Party : ‘नेटफ्लिक्स’च्या पार्टीत चमकले सितारे; भूमी जाळीदार टॉपमध्ये तर कृती… | पुढारी

Netflix Party : ‘नेटफ्लिक्स’च्या पार्टीत चमकले सितारे; भूमी जाळीदार टॉपमध्ये तर कृती...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘नेटफ्लिक्स’ ने नुकतेच मुंबईत एका खास पार्टीचे ( Netflix Party ) आयोजन केलं होतं. या पार्टीत खास करून बी-टाऊनशी संबंधित असणारे एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. या दरम्यान बॉलिवूड अभिनेता आमिर खानपासून ते अभिनेत्री भूमी पेडणेकरपर्यंत सर्वांनी पापाराझीच्या कॅमेऱ्याला पोझ दिली. या सोहळ्याचे व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर शेअर झाले आहेत. यात भूमी पेडणेकरच्या जाळीदार टॉपनं आणि कृती सेनॉनच्या वनपीसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

किंग खान आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खानने या पार्टीला दिमाखात हजेरी लावली. यावेळी तो लाल कलरच्या कुर्ता आणि ब्लॅक कलरच्या जीन्समध्ये एकदम हॅंडसम दिसला. या पार्टीत खास करून बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या ड्रेसनं सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी भूमी काळ्या रंगाच्या ट्यूब टॉपसोबत जाळीदार नेट टॉप कॅरी केला होता. तर तिने मोकळ्या केसांची स्टाईल, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

अभिनेत्री कृती सेनॉन (Kriti Sanon)ने स्काय ब्ल्यू कलरच्या सॅटिन ड्रेस परिधान केला होता. कृतीने एकता कपूरसोबत कॅमेऱ्याला पोझ दिली. ‘शहजादा’ फेम अभिनेत्री मनीषा कोइराला या पार्टीत ब्लू को-ऑर्ड ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली. तर बॉबी देओलच्या ‘आश्रम’ चित्रपटातील अभिनेत्री अदिती पोहनकरने ब्लॅक-गोल्डन कलरच्या ग्लिटर ड्रेसमध्ये चारचाँद लावले. ‘ये काली काली आंखें’ फेम अभिनेत्री आंचल सिंह ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये पार्टीत एन्ट्री केली.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर त्याची मुलगी रिया कपूर पार्टीत पोहोचले होते. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या पार्टीत रेड कलरच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसली. मोकळ्या केसांची स्टाईल, स्मॉकी आईज, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. याशिवाय रकुल प्रीत सिंह तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत, अदिती राव हैदरी, पत्रलेखा, आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप, साऊथ सुपरस्टार वेंकटेश दग्गुबाती आणि ‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबाती यांनी हजेरी लावली होती. ( Netflix Party )

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हेही वाचा : 

Back to top button