

पुढारी ऑनलाईन डेस्क : हवामानाची स्थिती पाहता पुढील काही दिवसांमधील देशातील काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, पुढील काही दिवसांत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर पश्चिम भारतात तापमान आणखी वाढेल. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (पश्चिमी चक्रावात) येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होणार आहे.
ऑरेंज अलर्ट हा यलो अलर्टपेक्षा एक पाऊल पुढे आहे. याचा अर्थ तुम्ही बेफिकीर राहू नका. त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वत: ला तयार करा. जेव्हा ऑरेंज अलर्ट जारी केला जातो तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले जाते आणि लोकांना इकडे-तिकडे जाताना खबरदारी घेण्यास सांगितले जाते.
हेही वाचा :