Arvind Kejriwal : ‘मला अटक होणार’ – अरविंद केजरीवाल | पुढारी

Arvind Kejriwal : 'मला अटक होणार' - अरविंद केजरीवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी शुक्रवारी (दि.१४) सीबीआयकडून समन्स जारी करण्यात आले होते. या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दखील न्यायालयीन कोठडीत आहेत. 26 फेब्रुवारी रोजी त्यांना अटक केली होती. याप्रकरणी आज (दि.१६) केजरीवाल यांची सकाळी ११ वाजता सीबीआय चौकशी होणार आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या सरकराची मला अटक करण्याची इच्छा आहे. वाचा सविस्तर बातमी. (Arvind Kejriwal)

अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (दि.१४) पत्रकार परिषद घेत, सीबीआयने मला रविवारी बोलावले आहे. मी जाणार, जर केजरीवाल भष्ट्राचारी आहे, तर या जगात प्रामाणिक कोणी नाही, असे स्पष्ट केले होते. आज (दि.१६) माध्यमांशी बोलताना म्हणाले, आज मला सीबीआयने बोलवलं आहे. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे देईन. मी जर काही चुकीचं केलं नसेल तर मी काही लपवण्याचा संबंध येत नाही. केजरीवाल यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला.

Arvind Kejriwal : सरकारला मला अटक करायची आहे

केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत निशाणा साधला. ते म्हणाले, गुजरातमध्ये भाजपच्या 30 वर्षांच्या राजवटीत मोदी १२ वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र एकही शाळेची स्थिती सुधारली नाही. दिल्लीच्या आप सरकारने ५ वर्षात सरकारी शाळांचा कायापालट केला आहे. ते म्हणाले की, भाजप ‘आप’ला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने सर्वप्रथम सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात पाठवले. आता त्यांना मला अटक करायची आहे.

हेही वाचा 

Back to top button