Atiq Ahmed Shot Dead: गँगस्टर अतिक आणि भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर संपूर्ण यूपीत कलम १४४ लागू; प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद | पुढारी

Atiq Ahmed Shot Dead: गँगस्टर अतिक आणि भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर संपूर्ण यूपीत कलम १४४ लागू; प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद

पुढारी ऑनलाईन: प्रयागराज येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी (दि.१५) रात्री या दोघांवर अचानक तीन अज्ञातांनी अतिक आणि त्याच्या भाऊ अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्या. यूपी पोलिसांकडून तात्काळ आरोपींना अटक करण्यात आली असून हत्येच्या ठिकाणी पोलिसांनी अलर्ट (Atiq Ahmed Shot Dead) जारी केला आहे. यानंतर संपूर्ण यूपीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्रयागराजमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इंटरनेट बंद केले आहे.

ज्या प्रयागराज जिल्ह्यात ही हत्या झाली, तेथे हाय अलर्ट असून रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) सह अतिरिक्त फौजा जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान सुरक्षेच्या, कारणास्तव उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही वृत्त (Atiq Ahmed Shot Dead)  आहे. घटनास्थळी पोलिसांची गस्त सुरू असून, पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Atiq Ahmed Shot Dead: हत्येनंतर 17 पोलिसांचे निलंबन

प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई करत 17 पोलिसांचे निलंबन केले आहे. हे सर्व पोलीस अतिक अहमदच्या सुरक्षेत तैनात होते. सीएम योगी यांनी हत्येच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

विशेष डीजी एलओ प्रशांत कुमार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. डीजीपी आरके विश्वकर्मा, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार, प्रधान सचिव गृह संजय प्रसाद आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button