वाहनचालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास ! पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने नाक्यांवर चिकटवली वसुली बंदची नोटीस | पुढारी

वाहनचालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास ! पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने नाक्यांवर चिकटवली वसुली बंदची नोटीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे कॅन्टोन्मेंटमधील वाहन प्रवेश कर रद्द झाल्याच्या निर्णयामुळे वाहनचालकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. या आदेशाची अंमलबाजवाणीही सुरू झाल्याने दररोज ये-जा करणार्‍या वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला. कॅन्टोन्मेंट कायद्यातील तरतुदीनुसार पुणे कॅन्टोन्मेंट वाहन शुल्क कर वसूल करत होता. त्यासाठी कॅन्टोन्मेंटच्या एकूण 13 प्रवेशद्वारांवर ही वसुली केली जात होती. त्यातून बोर्डाला 13 कोटी रुपयांचा महसूल मिळायचा. ही वसुली एका खासगी कंपनीमार्फत केली जात होती.

दररोज ये-जा करणारे वाहनचालक शुल्क भरून पावती घ्यायचे. मात्र, ज्यांना माहिती नसायची, असे वाहनचालक हे पुढे निघून गेल्यानंतर त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती. अशावेळी वादाचे प्रसंगही ओढावत होते. शुक्रवारपासून ही वसुली बंद करण्यात आली. त्यामुळे वाहनचालक नाक्यावर कोणीही नसल्याचे पाहून आजुबाजूला चौकशी करत आहेत. वसुली बंद केल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाने नोटीस चिटकवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही वसुली बंद करा, अशी मागणी होत होती.

दरम्यान, गेल्या वर्षी देशातील सर्व कॅन्टोन्मेंटमधील वसुली बंद करण्यात आली. मात्र, त्यावेळी पुणे कॅन्टोन्मेंटने आम्ही वाहन प्रवेश कर वसूल करतो, असे सांगत वसुली सुरू ठेवली होती. परंतु आता नव्याने बंद करण्याचे आदेश आले. त्यानुसार वसुली बंद करण्यात आली.

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?