Solar Eclipse 2023 | ‘हायब्रिड सूर्यग्रहण’ २० एप्रिलला, तीन रूपांत दिसणार, १०० वर्षांनंतर असा योगायोग | पुढारी

Solar Eclipse 2023 | 'हायब्रिड सूर्यग्रहण' २० एप्रिलला, तीन रूपांत दिसणार, १०० वर्षांनंतर असा योगायोग

Solar Eclipse 2023 : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी होत आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा या खगोलीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, तेव्हा या स्थितीला ग्रहण म्हटले जाते. ही घटना दरवर्षी पहायला मिळते. यावेळच्या सूर्यग्रहणामध्ये विशेष काय असेल, ग्रहणाचा कालावधी किती असेल, या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊया.

केव्हा होईल सूर्यग्रहण?

  • या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी सकाळी ७.०४ ते दुपारी १२.२९ या वेळेत होणार आहे. मुख्य म्हणजे नव्या वर्षातील हे पहिलेच सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
  • हे ग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, तैवान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, दक्षिण हिंद महासागर आणि न्यूझीलंडमध्ये दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
  • वर्षातील पहिले सूर्यग्रहण हायब्रिड (hybrid) आहे. हाइब्रिड ग्रहण हे आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृतीचे मिश्र स्वरूप असते.
  • खगोलशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार १०० वर्षात पहिल्यांदाच हे अद्भूत दृश्य पाहायला मिळणार आहे.
  • यावेळचे सूर्यग्रहण आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती अशा तीन प्रकारे दिसणार आहे.
  • कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी चंद्र देखील सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान जातो, पण संपूर्ण ग्रहणावेळी तो पृथ्वीपासून खूप दूर असेल. याचा अर्थ चंद्र “अग्नीची रिंग” स्वरुपात दिसेल. (Solar Eclipse 2023)


हे ही वाचा :

Back to top button