COVID-19 | देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे १० हजारांवर रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ५३,७२० वर | पुढारी

COVID-19 | देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे १० हजारांवर रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ५३,७२० वर

पुढारी ऑनलाईन : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे १० हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०,७५३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ५३,७२० वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सहा महिन्यांत प्रथमच गुरुवारी देशातील दैनंदिन कोरोना मृत्यूसंख्या २० वर पोहोचली. कोरोनाने १४ राज्यांमध्ये किमान एकाचा बळी घेतला. देशाच्या अनेक भागांमध्ये संसर्ग वाढल्याने गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्या ११ हजारांवर गेली होती. कोरोनामुळे होणारे मृत्यू तुलनेने कमी आहे. पण गेल्या काही आठवड्यांपासून देशात सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याने मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. केरळमध्ये याआधी झालेल्या ९ मृत्यूंची आता नोंद झाल्याने गुरुवारी एकूण मृतांची संख्या २९ वर गेली. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी देशात २० हून अधिक कोविड मृत्यूची नोंद झाली होती.

दिल्ली आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन मृत्यूची नोंद झाली. पंजाब आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये शुक्रवारी आणखी तीन मृत्यूची नोंद झाली, तर महाराष्ट्रात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता वाढला आहे.

देशातील सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांवर गेली आहे. गेल्या वर्षीच्या ७ सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांवर गेला होता. देशाक कोविड -19 चा संसर्ग स्थानिक पातळीवर पसरत आहे. पुढील १०-१२ दिवसांत रुग्णसंख्या वाढू शकते आणि त्यानंतर ते कमी होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा :

Back to top button