high court judge : देशातील सात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या बदल्या - पुढारी

high court judge : देशातील सात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या बदल्या

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

देशातील सात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची (high court judge) बदली करण्यात आली आहे. पंजाब-हरियाणा, मद्रास, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा त्यात समावेश आहे.

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजन गुप्ता यांची पटणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टीएस शिवगनानम यांची कोलकाता उच्च न्यायालयात, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेश्वर ठाकुर यांची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी.बजंथरी आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश शर्मा यांची पटना उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमरनाथ गौड यांची त्रिपुरा उच्च न्यायालयात आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष चंद यांची झारखंड उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

high court judge : आठ उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती

यापूर्वी ९ ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारसीनूसार आठ उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती केली होती. यासह इतर चार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची बदली करण्यात आली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपदी बदली करण्यात आली आहे.

शिवाय मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रंजीत व्ही. मोरे यांना याच न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश यांची तेलंगना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button