Earthquake : बिहारमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप | पुढारी

Earthquake : बिहारमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप

पुढारी ऑनलाईन: बिहारमधील अररिया शहरात बुधवारी (दि.१२) पहाटे ४.३ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होता. बिहारप्रमाणेच पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी रविवारी निकोबार बेटावर ५.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. रविवारी (दि.०९) दुपारी ४ वाजून १ मिनिटांच्या सुमारास भूकंप झाला होता.

पश्चिम नेपाळमध्ये ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप

पश्चिम नेपाळमध्ये मंगळवारी (दि.११) ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूच्या पश्चिमेला १४० किमी अंतरावर असलेल्या गोरखा जिल्ह्यातील बलुवा भागात होता. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी हा भूकंप झाला.

हेही वाचा:

Back to top button