Devendra Fadnavis: ‘वारसा जन्माने नाही, तर विचाराने मिळतो’- फडणवीसांचे ठाकरेंवर टिकास्त्र | पुढारी

Devendra Fadnavis: 'वारसा जन्माने नाही, तर विचाराने मिळतो'- फडणवीसांचे ठाकरेंवर टिकास्त्र

पुढारी ऑनलाईन: ‘वारसा हा जन्माने नाही, तर तो विचारांनी मिळतो, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आज (दि. 9) मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी अयोध्येला रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत दाखल झाले आहेत. लखनऊ विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले, आज (दि.९) मी आणि मुख्यमंत्री रामलल्लाचे एकत्रित दर्शन घेणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे. विरोधकांना रामाची आस्था राहिली नसेल, पण आम्हाला रामल्लाची आस्था आहे. रामराज्यासाठी रामाचे दर्शन घ्यावेच लागेल. गांधीजींची संकल्पना देखील रामराज्याचीच होती, असे देखील फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

शरद पवार हे गेले वीस वर्षांपासून काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याची निशेध करत असल्याचे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा:

Back to top button