तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर पीएम मोदींच्या कार्यक्रमाला गैरहजर?

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
Published on
Updated on

हैदराबाद : पुढारी वृत्तसेवा – तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. पंतप्रधान मोदी आज तेलंगणामधील ११ हजार ३६० कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला के. चंद्रशेखर राव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पण, के. चंद्रशेखर राव पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी बेगमपेठ विमानतळावर उपस्थित नसतील, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तामिळनाडू आणि तेलंगानाच्या दौऱ्यावर असतील. पीएम मोदी चेन्नई आणि हैदराबादमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.

चेन्नईहून मिळालेल्या माहितीनुसार, AIADMK चे महासचिव पलानीस्वामी (EPS) आणि ओ पन्नीरसेल्वम (OPS) यांनी पंतधान मोदी यांना भेटण्यासाठी वेगवेगळी वेळ मागितलीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news