Marriage Story : अनोखं लग्न! पाच तृतीयपंथीयांनी केलं आपल्याच गुरूशी लग्न | पुढारी

Marriage Story : अनोखं लग्न! पाच तृतीयपंथीयांनी केलं आपल्याच गुरूशी लग्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नाचे विविध किस्से आपण ऐकत असतो, पाहत असतो. अशाच एका लग्नाची चर्चा होत आहे. या लग्नात चक्क पाच तृतीयपंथीयांनी आपल्याच गुरूशी लग्न केलं आहे. आता ते आपल्या गुरुच्या नावाचा सिंधूर लावणार आहे. त्याचबरोबर अलंकारही घालणार आहेत. हे अनोखं लग्न छत्तीसगड राज्यातील जांजगीर चंपा जिल्ह्यात झालं आहे. त्यांनी आपल्या गुरुशी लग्न झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. या लग्नासाठी तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचा सविस्तर बातमी. (Marriage Story)

Marriage Story : तीन दिवस लग्नसमारंभ

छत्तीसगड राज्यातील जांजगीर चंपा जिल्ह्यातील एका लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. हे लग्नही तसं अनोखं आहे. या लग्नात पाच तृतीयपंथीयांनी आपल्याच गुरूशी लग्न केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. हा लग्न समारंभ तीन दिवस चालला. पहिल्या दिवशी, रविवारी (दि.२) या पाच तृतीयपंथीयांनी आपली कुलदेवता बहुचरा मातेची पूजा केली.  दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.३) मातेसमोर हळदीचा सोहळा तर तिसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.४) राज्यभरातील तृतीयपंथीयांनी कलश यात्रा काढली.

रविवारी बहुचरा मातेचे पूजन केल्यानंतर माही, ज्योती, राणी, काजल, सौम्या या पाच तृतीयपंथीयांचा विवाह विधी पार पडला. या विवाह समारंभात त्यांच्या कुटुंबीयांनीही सहभाग घेतला होता. त्यांचा विवाह त्यांची गुरु शारदा नायक यांच्याशी पार पडला. तृतीयपंथीयांच्या या लग्नात त्यांनी नवरीसारखी साडी नेसल्या होत्या. त्याचवेळी हातात खंजीर घेऊन तृतीयपंथीयांनी वराच्या रुपात हळदीचा सोहळा पार पाडला.

गुरूच्या नावानेच सिंधूर आणि अलंकार

या पाच तृतीयपंथीयापैकी माहीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ती इतर तृतीयपंथीयांना सन्मानाचे जीवन जगण्यास प्रवृत्त करण्यास प्रवृत्त करणार आहे. माही म्हणाली की तृतीयपंथीय देखील माणूसच आहेत आणि त्यांनाही त्यांचे जीवन जगण्याचा अधिकार आहे. सर्व स्त्री-पुरुष मिळून केलेला विवाह सोहळाही पार पाडला जातो. आज तसचं आमचही लग्न होत आहे. आता गुरूच्या नावानेच सिंधूर आणि अलंकार घालणार आहेत. या कार्यक्रमात तृतीयपंथीयही आले होते.

या लग्नसमारंभात तृतीयपंथीयाचे नातेवाईकही सहभागी झाले होते. ते सांगतात आमचे नातेवाईक समारंभात सहभागी झाले याचा आम्हाला अभिमान आहे. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात देवीची पूजा, हळदीचा विधी, नृत्य व मेजवानी, लोककल्याणासाठी कलश यात्रा असा सुखद अनुभव आल्याचे नातेवाइकांनीही सांगितले.

हेही वाचा

Back to top button