तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाऱ्यांना मिळाली सर्वात जास्त शिक्षा : कपिल सिब्बल | पुढारी

तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाऱ्यांना मिळाली सर्वात जास्त शिक्षा : कपिल सिब्बल

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाऱ्यांना सर्वात जास्त शिक्षा मिळाली असल्याचे सांगत राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कोणताही भ्रष्टाचारी वाचावयास नको’ या विधानावर टीका केली आहे. सध्याच्या काळात भ्रष्टाचाऱ्यांचे संरक्षण कोण करीत आहे? असा सवालही सिब्बल यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून पंतप्रधानांना विचारला आहे.

कार्मिक खात्याचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार २०१३ मध्ये १ हजार ११६ लोकांवरील भ्रष्टाचाराचे आरोप शाबित झाले होते. २०१४ आणि २०१५ मध्ये हाच आकडा क्रमशः ९९३ आणि ८७८ इतका होता. यावरुन तत्कालीन संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचाऱ्यांवर जास्त कारवाई झाल्याचे दिसून येते. भ्रष्टाचारी लोकांना वाचवू नका, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी सीबीआयला दिला आहे. मात्र आकडेवारी वेगळेच दृश्य दर्शविते. लोक खोटे बोलू शकतात, पण वास्तव खोटे बोलू शकत नाही, असा टोलाही सिब्बल यांनी लगावला आहे.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button