दिलासादायक! व्‍यावसायिक सिलिंडरच्‍या दरात कपात, जाणून घ्‍या नवे दर | पुढारी

दिलासादायक! व्‍यावसायिक सिलिंडरच्‍या दरात कपात, जाणून घ्‍या नवे दर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : व्‍यावसायिक एलपीजी सिलिंडरच्‍या किंमतीमध्‍ये कपात करण्‍यात आली आहे. १आजपासून  ९ किलोच्‍या व्‍यावसायिक एलपीजी सिलिंडरच्‍या किंमती ९१ रुपयांनी कमी झाल्‍या आहेत. ( Commercial LPG cylinder )

दिल्‍लीत १९ किलोच्‍या व्‍यावसायिक सिलिंडरलच्‍या किंमत २,०२८ रुपये इतकी आहे. देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्‍या किंमतीमध्‍ये कोणताही बदल झालेला नाही, असे ‘एएनआय’ने म्‍हटले आहे. ( Commercial LPG cylinder )

विमा पॉलिसी ते सोने खरेदीत आजपासून होणार ‘हे’ ठळक बदल

आज १ एप्रिलपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम नागरिकांवर होणार असून, बदललेल्या या नियमांची झळ बसणेही शक्य आहे. विमा पॉलिसीपासून ते सोने खरेदीपर्यंतचे हे बदल आहेत. लोकांच्या खिशावरही या बदलांचा ताण पडेल. अनेक आर्थिक आणि गुंतवणुकीसंदर्भातील बदलांचा यात समावेश आहे. आधार कार्ड पैन कार्ड लिंकिंगला मुदतवाढ देण्यात आल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. आधार कार्ड मतदान ओळखपत्र लिंकिंगलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.

जीवन विमा पॉलिसी

५ लाख रुपयांच्या वार्षिक श्रीमियमपेक्षा अधिक जीवन विमा हप्त्यातून होणारे उत्पन्न १ एप्रिलपासून करपात्र असेल. गुंतवणूकदारांना करावा लागेल.

डेट फंड कर सवलत नाही

सध्याच्या काळात डेट फंडमध्ये गुंतवणूकदारांना नसाल. फिक्स डिपॉझिटचा कर फायदा मिळतो. डेट फंडमध्ये ३ पिक्षा जास्त काळ रक्कम ठेवल्यास इंडेक्सेशन बेनिफिटसह २० टक्के लॉग टर्म कैपिटल गेन कर आकारला जातो. वास्तविक फिक्स्ड डिपॉझिटवर मिळत असलेले व्याज टॅक्स स्लॅबनुसार असते. नव्या प्रस्तावानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत डेट फंडाच्या

हॉलमार्क नंबरशिवाय सोने विक्री नाही

ग्राहक मंत्रालयाने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. १ एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नव्या नियमान्वये ३१ मार्च २०२३ नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशनवर दागिने खरेदी-विक्री करता येणार नाहीत. १ एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य असतील. इंडेक्शनचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही २० टक्के टॅक्स बेनिफिटसाठी पात्र

… तर डीमॅट नॉमिनीसाठी मुदतवाढ

डीमॅट खातेधारकांनी १ एप्रिलपूर्वी नॉमिनोचे नामांकन करणे बंधनकारक केले होते. मात्र आता ही मुदत वाढवून ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. सेची परिपत्रकानुसार, डीमॅट ट्रेडिंग खात्यात नॉमिनी जोडणे आवश्यक आहे.

‘सेबी’ने सर्व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ३१ मार्चपूर्वी त्यांचे नॉमिनी निश्चित करण्याचे आदेश दिले होते. तसे न केल्यास १ एप्रिल २०२३ पासून पोर्टफोलिओ गोठवला जाईल. तपशील सबमिट केल्यानंतरच ते सुरू होईल.

९०० औषधांत दरवाढ

९०० औषधांच्या किमती किमान १२ टक्क्यांनी वाहणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. या औषधांमध्ये अत्यावश्यक तसेच हृदयविकारासील औषधांचा समावेश आहे.

नवीन कर व्यवस्था

केंद्र सरकारची नवीन कर व्यवस्थाही १ एप्रिलपासून लागू होत आहे. अर्थसंकल्प २०२३ मध्ये ७ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर कर सवलतीची तरतूद आहे. करदात्यांनी जुनी कर व्यवस्था निवडली तर त्यांना या सवलतीवर पाणी सोडावे लागेल.

कार होतील महाग

११ एप्रिलपासून कारमध्ये ओवीडी-२ हे यंत्र बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे कारच्या किमतीत वाद होणार आहे.

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल

नवीन करत कररचनेत ते ३ लाख रुपयांवर शून्य ते ६ लाखांच५ टक्के ६ ते ९ लाख रुपयांवर १० टक्के, ९ ते १२ लाखांवर १५ टक्के आणि १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के सवलत मिळेल. एलटीए मर्यादिती वाढ करण्यात आली आहे. खासगी कर्मचा-यांना लिन्छ इन्कॅशमेंट २००२ नुसार ३ लाख रुपये होती. ती आता २५ लाख करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी ओळखपत्र

दिव्यांगांना १७ सरकारी योजनांचा लाभ मिळतो; पण त्यासाठीही १ एप्रिलपासून बंधनकारक करण्यात आले आहे.

 

हेही वाचा : 

 

Back to top button