Amritpal Singh : अमृतपाल सिंगचा व्हिडियो आला समोर, म्हणाला, 'अटक' फक्त 'वाहे गुरुं'च्या हातात... | पुढारी

Amritpal Singh : अमृतपाल सिंगचा व्हिडियो आला समोर, म्हणाला, 'अटक' फक्त 'वाहे गुरुं'च्या हातात...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amritpal Singh : फरार खलिस्तानवादी अमृतपाल सिंग विषयी दररोज नवीन गोष्टी समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी पर्यंत तो आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याच दिवशी त्याचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो पोलिसांना सरळ आव्हान देत म्हणत आहे की, माझी अटक ही फक्त वाहे गुरुंच्या हातातच, माझ्या केसांना ही कोणी धक्का लावू शकत नाही असे त्याने व्हिडिओत म्हटले आहे. तसेच शीख युवकांना पुन्हा भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.

Amritpal Singh : अमृतपाल सिंगचे पोलिसांना उघड-उघड आव्हान

अमृतपाल सिंगचा हा व्हिडिओ बुधवारी (दि.29) समोर आला आहे. यामध्ये त्याने काळ्या रंगाची पगडी आणि शॉल घातली आहे. ही शॉल तीच आहे जी पपलप्रीत सिंहच्या हातात पाहिली होती. व्हिडिओत त्याने आपण एकदम सुखरूप असल्याची माहिती दिली. या व्हिडिओतून त्याने उघड-उघड पोलिसांना आव्हान दिले आहे. तो म्हणाला मला अटक होणे हे फक्त वाहे गुरुंच्या हातात आहे. मला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांपासून वाहे गुरुंनीच मला वाचवले. तसेच त्याने असेही म्हटले आहे की, राज्य सरकारलाच मला अटक करण्याची इच्छा नव्हती. कारण तसे असते तर पोलिस मला माझ्या घरी येऊन अटक करू शकत होती. मी हार मान्य केली असती. त्याने निष्पाप शीख युवकांना अटक केल्याच्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. तसेच शीख युवकांना भडकावण्याचा देखील प्रयत्न केला.

Amritpal Singh : अकाल तख्तच्या जत्थेदारांना बैसाखीत सरबत खालसा बोलवण्याचे आवाहन

अमृतपालने व्हिडिओच्या माध्यमातून श्री अकाल तख्त साहिब च्या जत्थेदारांना बैसाखीच्या वेळी सरबत खालसा बोलवण्याचे आवाहन केले. तसेच यामध्ये देश-विदेशच्या शीखांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. तसेच आपली कौम तयार करण्याची वेळ आली आहे, असेही त्याने म्हटले आहे. श्री अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी सोमवारी पंजाब सरकारला अटक केलेल्या शीख युवकांना 24 तासात मुक्त करण्यासाठी धमकावले होते. मात्र, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ने यावर कडक प्रतिक्रिया देऊन जत्थेदारांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

Amritpal Singh : भटिंडाच्या तख्त श्री दमदमा साहिब येथून करणार होता आत्मसमर्पण

या व्हिडिओपूर्वी अमृतपाल भटिंडा येथील तख्त श्री दमदमा साहिब येथे आत्मसमर्पण करणार असल्याचीही चर्चा होती. श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांच्यामार्फत ते आत्मसमर्पण करणार आहेत. एसएसपी गुलनीत सिंग खुराना यांनी स्वत:हून कमांड घेतली. जथेदारांच्या कोठीकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली होती, मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमृतपाल तेथे न पोहोचल्याने पोलिस बंदोबस्त मागे लागला. त्यामुळे अमृतपाल सिंगच्या आत्मसमर्पणच्या फक्त अफवाच होत्या.

हे ही वाचा :

‘देसी गर्ल’ च्या गाण्यावर मोनालिसाचा देसी डान्स

Amritpal Singh : अमृतपाल सिंग आज आत्मसमर्पण करणार? पोलिसांची घेराबंदी, पंजाबमध्ये मोठ्या हालचाली…

Mahila Samman Yojana : ‘हाफ तिकीट’मुळे ताई, माई, आक्कांचा ‘एसटी’ प्रवास जोरात

Back to top button