Mango Crop Damage : वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे २० टक्के आंबा पिकाचे नुकसान; आयसीएआरची माहिती | पुढारी

Mango Crop Damage : वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे २० टक्के आंबा पिकाचे नुकसान; आयसीएआरची माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे देशातील २० टक्के आंबा पिकाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चरल रिसर्चकडून [आयसीएआर] शुक्रवारी (दि.३१) व्यक्त करण्यात आला. विशेषतः उत्तर भारतात आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याचे आयसीएआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. (Mango Crop Damage)

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची लागवड उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. जगातील एकूण आंबा उत्पादनापैकी ४२ टक्के आंबा भारतात पिकविला जातो. देशाच्या काही भागात हवामान बदल, जोरदार वारे, गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे गव्हासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Mango Crop Damage)

आंबा पीकदेखील नुकसानीतून सुटलेले नाही. देशभरात साधारणतः २० टक्के आंब्याचे नुकसान झाले असण्याचा अंदाज आहे, असे आयसीएआरचे फलोद्योन विभागाचे उपमहासंचालक ए. के. सिंग यांनी सांगितले.

उत्तर भारतात प्रामुख्याने उत्तर प्रदेशात आंबा पीक जास्त प्रमाणात आहे आणि या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान अधिक आहे, असे सिंग यांनी नमूद केले. उत्तर भारतात आंबा पिकाचे सुमारे 30 टक्के नुकसान झाले असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दक्षिण भारतात नुकसानीचे प्रमाण कमी असून याठिकाणी 8 टक्के नुकसानीचा अंदाज आहे.

अधिक वाचा :

Back to top button