Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ | पुढारी

Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

पुढारी ऑनलाईन: दिल्लीचे उपमुख्यमंत्री, आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia ) यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दिवसेंदिवस सिसोदियांच्या अडचणीत वाढच होत आहे. आज (दि.२०) या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने पुन्हा सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. सध्या मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया २२ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.

मनीष सिसोदिया (Manish Sisodia ) यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ झाल्याने ते ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार. मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर व्हीसीमार्फत न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात, सीबीआयने म्हटले आहे की तपास अद्याप सुरू आहे आणि तो गंभीर टप्प्यावर आहे.

काय आहेत आरोप 

मद्य धोरण घोटाळ्यातील सिसोदिया यांच्या भूमिकेचा ईडी तपास करीत आहे. वारंवार फोन बदलून पुरावे नष्ट करणे, मद्यविक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांचे कमिशन 5 टक्क्यांवरून वाढवून 12 टक्के करणे, या बदल्यात लाच घेणे, दक्षिण भारतातील मद्य कार्टेलकडून आप नेता विजय नायरच्या माध्यमातून पैसे घेणे याशिवाय मद्य धोरण बदलण्यातील त्यांच्या भूमिकेचा तपास सुरु आहे. घोटाळ्याची व्याप्ती आणि पैसा कसा आला, कसा गेला, या बाबींवर तपासाचा केंद्रबिंदू असल्याचे ईडी सूत्रांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा 

Back to top button