दिल्ली-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसला नरेंद्र मोदी शनिवारी हिरवा झेंडा दाखवणार | पुढारी

दिल्ली-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसला नरेंद्र मोदी शनिवारी हिरवा झेंडा दाखवणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली ते मध्य प्रदेशातील भोपाळ दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालविली जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. १) या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. दिल्ली ते भोपाळ दरम्यानचे अंतर ७०८ किलोमीटर इतके आहे. वंदे भारत एक्सप्रेस हे अंतर ७ तास ४५ मिनिटात पूर्ण करेल.

दिल्ली-भोपाळ दरम्यानचे अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसला शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत एक तास कमी वेळ लागेल. वंदे भारत एक्सप्रेसला एकूण १६ डबे असतील. पलवल ते आग्रा स्थानकांदरम्यान ही गाडी १६० किलोमीटर प्रतितास, आगरा ते ललितपूरदरम्यान १३० किलोमीटर प्रतितास तर ललितपूर ते बीना स्थानकांदरम्यान १२० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावेल. भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकातून ही गाडी सकाळी ५.५५ वाजता निघेल. वंदे भारत एक्सप्रेसला केवळ आग्रा कॅन्ट स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. आग्रा येथे ही गाडी ११.४० वाजता पोहोचल तर दिल्लीत ती दुपारी १.४५ वाजता पोहोचेल. दुसरीकडे दिल्लीतून ही गाडी दुपारी २.४५ वाजता निघेल. सायंकाळी ४.४५ ला ती आग्रा तर रात्री १०.४५ वाजता भोपाळला पोहोचेल.

हेही वाचा : 

Back to top button