Nobel Peace Prize : मारीया रेस्सा आणि दिमित्री मुरातोव्ह यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर | पुढारी

Nobel Peace Prize : मारीया रेस्सा आणि दिमित्री मुरातोव्ह यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

नॉर्वे; पुढारी ऑनलाईन

फिलीपिन्समधील पत्रकार मारीया रेस्सा आणि रशियाच्या दिमित्री मुरातोव्ह यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याकडे त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीसाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पूर्व अट असल्याचे नोबेल पुरस्कार निवड समितीने पुरस्कार जाहीर करताना म्हटले आहे. फिलीपिन्समधील पत्रकार मारीया रेस्सा आणि रशियाच्या दिमित्री मुरातोव्ह यांनी आपल्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

Back to top button