सिगारेट्स व तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी भरपाई उपकर दरावर मर्यादा | पुढारी

सिगारेट्स व तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी भरपाई उपकर दरावर मर्यादा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पानमसाला, सिगारेट्स तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी भरपाई उपकर दरावर केंद्र सरकारने कमाल मर्यादा घातली आहे. अलीकडेच संसदेत मंजूर झालेल्या वित्त विधेयकात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.
पानमसाल्यावरील भरपाई उपकर मर्यादा रिटेल विक्री किंमतीच्या तुलनेत 51 टक्क्यांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या प्रणालीत ऍड व्हलोरम तत्त्वावर पानमसाल्यावर 135 टक्के इतका भरपाई उपकर आकारला जातो. तंबाखूजन्य पदार्थांवरील कमाल उपकर मर्यादा प्रती एक हजार कांड्यामागे 4 हजार 170 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय रिटेल विक्री किंमतीच्या तुलनेत 290 टक्के ऍड व्हलोरम अथवा शंभर टक्के इतका कर आकारला जाईल.
 
हेही वाचा :

Back to top button