ठाणे : धावत्या रेल्वेत दिव्यांगाला जाळले; जखमीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू | पुढारी

ठाणे : धावत्या रेल्वेत दिव्यांगाला जाळले; जखमीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे : पुढारी वत्‍तसेवा : धावत्या रेल्वेत एका दिव्यांग व्यक्‍तीला गर्दुल्‍याने जाळण्याचा प्रयत्‍न केला. ही धक्कादायक घटना काल (शनिवार) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमीचा डावा हात पूर्णपणे होरपळला असून, त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या ठाणे लोहमार्ग पोलिसांचे पथक रुग्णालयात असून, जखमीचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

प्रमादे वाडेकर (अंदाजे वय ३५ ) असे जखमीचे नाव आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलमधील दिव्यांगांच्या राखीव डब्यातून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान लोकल कळवा- मुंब्रा स्थानकात येताच एका गर्दुल्याने त्याच्या सोबत हुज्जत घातली. त्‍यानंतर नशेसाठी वापरला जाणारा द्रव पदार्थ त्‍या दिव्यागाच्या अंगावर फेकून माचीस पेटवून आग लावली. यामध्ये दिव्यांग प्रमोद वाडेकर हा गंभीर जखमी झाला. त्‍याचा डावा हात होरळपला. या घटनेतील संशयीत आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस स्‍टेशनचे पंढरी कांदे यांनी दिली आहे.

हेही वाचा ; 

Back to top button