

जम्मू- काश्मीर; पुढारी ऑनलाईन : लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या संघटनेशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी उत्तर काश्मीरमधील (J&K) बंदीपोराच्या सूम्लर भागात अटक केली आहे. अबरार अहमद वानी आणि दानिश परवेझ अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्हेगारी साहित्य आणि २ चिनी ग्रेनेड जप्त केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
"दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिस तसेच आर्मी (14RR) आणि CRPF (3rd BN) यांनी मिळून कारवाई करत फिशरीज फार्म बंदीपोराजवळील सुम्लर येथील चौकीवर अबरार अहमद वानी आणि दानिश परवेझ या दोन संशयित व्यक्तींना रोखले. दोघेही सूम्लर बंदीपोरा येथील रहिवासी आहेत, असे पोलिस प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
"तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून २ चिनी ग्रेनेड आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा :