NIA कडून दहशतवाद संबंधित प्रकरणात जम्मू काश्मिरमध्ये छापेमारी | पुढारी

NIA कडून दहशतवाद संबंधित प्रकरणात जम्मू काश्मिरमध्ये छापेमारी

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दहशतवादी संघटना प्रकरणात जम्मू आणि काश्मीरमध्ये आज (दि.१४) छापेमारी करण्यात आली. दहशतवादी संघटनाचे प्रमुख, सदस्य आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणी NIA ने ही कारवाई केली आहे. याप्रसंगी जम्मू काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अचबल येथील काही दृश्ये एएनआय वृत्तवाहिने प्रसिद्ध केले आहेत.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) दहशतवादी फंडिंग प्रकरणी चालू असलेल्या तपासाचा भाग म्हणून जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. याप्रकरणी जम्मू काश्मिरमधील कुलगाम, पुलवामा, अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी कारवाईसंबंधित संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. दरम्यान जम्मू काश्मिरमधील अल्पसंख्याक सुरक्षा कर्मचार्‍याच्या हत्येप्रकरणीसुद्धा NIA ने J-K मध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या पथकांसोबत पोलिस आणि सीआरपीएफचे जवानही होते.

गेल्या आठवड्यात, अंमलबजावणी संचालनालयाने हुर्रियत नेते काझी यासिर आणि जम्मू-काश्मीर साल्वेशन मूव्हमेंटचे अध्यक्ष जफर भट यांच्या घरांवर छापे टाकले.

हेही वाचा:

Back to top button