राहुल गांधी पुन्हा खोटे बोललेत; भाजपचा पलटवार | पुढारी

राहुल गांधी पुन्हा खोटे बोललेत; भाजपचा पलटवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी यांच्या प्रमाणेच देशातील ३२ सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालं आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात सहा केसेस आहेत. अदानी प्रकरण आणि त्यांच्या कारवाईचा काहीही संबंध नाही. २०१९ मध्ये केलेल्या भाषणाची शिक्षा राहुल गांधींना झाली आहे. पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी खोटी विधाने करण्याचा प्रयत्न केला. आज ते म्हणाले की ‘मी विचारपूर्वक बोलतो’ याचा अर्थ 2019 मध्ये राहुल गांधी जे काही बोलले ते विचारपूर्वक बोलले, असा पलटवार भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार रविशंकर प्रसाद यांनी केला.

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्र सोडले. याला पत्युत्तर देताना भाजपचे नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांच्याप्रमाणेच देशातील ३२ सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालं आहे. दोन वर्ष शिक्षा झाली तर सदस्यत्व रद्द होईल, असा देशाचा कायदा आहे. गांधींच्यासाठी दुसरा कायदा नाही. लंडनमध्ये काही बोललो नाही, असं राहुल गांधी आज पुन्हा खोटे बोललेत. त्यांच्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्ष देशभर तीव्र आंदोलन करणार आहे. खोट बोलणे ही त्यांची सवय आहे. परदेशात जाऊन गांधी भारतावर टीका करतात. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केलाय. काँग्रेसचा विजय झाला तर देशात लोकशाही आहे आणि पराभव झाला तर लोकशाही खराब. न्यायालयाने, निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर निपक्ष आणि नाही दिला तर कमजोर, ही काँग्रेस आणि राहुल गांधींची राजकीय नीती आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा : 

Back to top button