खोटेपणा, वैयक्तिक निंदानालस्ती, नकारात्मकता हा राहुल गांधी यांच्या राजकारणाचा अविभाज्य भाग ; जे. पी. नड्डा यांची टीका | पुढारी

खोटेपणा, वैयक्तिक निंदानालस्ती, नकारात्मकता हा राहुल गांधी यांच्या राजकारणाचा अविभाज्य भाग ; जे. पी. नड्डा यांची टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : खोटेपणा, वैयक्तिक निंदानालस्ती आणि नकारात्मकता हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. ‘मोदी’ आडनावावरून राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यापासून काँग्रेस आणि भाजप यांच्यादरम्यान कलगीतुरा सुरु झाला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडलेले आहे.

ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्याचा दाखला देत बनावट व खोटेनाटे आरोप करणे, ही राहुल गांधी यांची सवय बनली असल्याचे सांगून नड्डा पुढे म्हणाले की, गांधी यांची समज खूप कमी आहे. तर त्यांच्याकडे अहंकार मोठा आहे. लोकसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता त्यांना २०१९ च्या निवडणुकीपेक्षाही मोठा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी यांनी इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजाची तुलना चोरांसोबत केली आहे. त्यांची जातीयवादी मानसिकता याद्वारे दिसून आली आहे. ओबीसी समाज लोकशाहीच्या मार्गाने या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा 

Back to top button